▪️ शिवसेनेचे उमेद्वार ना. श्री. राजू पारवेंच्या जनसंवाद रथाला उत्सर्फूत प्रतिसाद
▪️ रामटेक खेचण्यासाठी महायुतीचे सर्वच कार्यकर्ते एकवटले
रामटेक समाचार : कन्हान, वैनगंगा, आम, मुर्झा आणि कोलार अशा पाच नद्यांचा संगम आंभोरा येथे आहे. तीर्थक्षेत्र आंभोरा हे विदर्भातील पर्यटनाचे केंद्र आहे. रामटेकच्या भूमिपूत्रांना पर्यटनाच्या माध्यमातून हाताला रोजगार मिळविण्याकरिता आपण प्रयत्नशिल आहोत. संसदेत गेल्यावर पर्यटनाच्या निमित्ताने अनेक उद्योग रामटेकमध्ये खेचून आणून स्थानिकांना रोजगार देण्याचा आपला संकल्प असल्याचा निर्धार तीर्थक्षेत्र अंभोराच्या साक्षी ने मी करीत असल्याचे मा. श्री. राजू पारवे यांनी केला. महायुतीचे उमरेडचे माजी आमदार तसेच महायुतीचे रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे शिवसेनेचे लोकप्रिय उमेदवार मा. श्री. राजू देवनाथ पारवे यांच्या उमरेड विधानसभा क्षेत्रातील जनसंवाद रथ यात्रेची सुरुवात शनिवारी अंभोरा येथील श्री. चैतैनेश्वर शिव मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचार दौऱ्याची सुरुवात करण्यात आली, त्यावेळी मा. श्री. राजू पारवे बोलत होते.
अंभोरा, वेलतूर, खुर्सापार, कुही, उमरेडसह जागोजागी रथाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी घोषणा, फुलांचा वर्षाव आणि ढोल-ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांच्या उदंड उत्साहाचा पूर या जनसंवाद रथामध्ये अनुभवाला आला. मा. श्री. राजू पारवे यांच्या जनसंवाद यात्रा आज (शनिवारी) उमरेड विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या अंभोरा येथून सुरुवात करण्यात आली. शनिवारी सकाळी ८ वाजता अंभोरा येथील श्री. चैतैनेश्वर शिव मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर जनसंवाद रथ यात्रेची सुरुवात झाली. यानंतर प्रचार कार्यालयातून जनसंवाद रथ यात्रेचे ढोल ताश्याच्या गजर आणि आतिषबाजी ने सर्व परिसर दणानून सोडला. याप्रसंगी रामटेकचे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह महायुतीच्या घटक पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना मा. श्री. राजू पारवे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या नेतृत्वात महायुती येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत 400 हून अधिक जागा जिंकणार असून त्यातील रामटेकच्या जागेचा त्यात समावेश आहे. देशात सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात महायुतीच्या 45 च्यावर जागा येणार. शिवसेना प्रमुख तसेच मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, भाजपचे जेष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुतीची रामटेक लोकसभेची जागा मोठ्या फरकाने निवडून येणार असल्याचा विश्वासही मा. श्री. राजू पारवे यांनी व्यक्त केला. रामटेक जिल्ह्यातील मूलभूत प्रश्नांना सोडविण्यासाठी शिवसेनेचा पुन्हा भगवा फडकविण्यासाठी मतदारांनी धनुष्यबाण चिन्हाला जिंकून देण्याचे आवाहनही मा. श्री. राजू पारवे यांनी केले.
अंभोरा, वेलतूर, खुर्सापार, कुही, उमरेडमध्ये जल्लोषात स्वागत
आंभोरा, अडेगाव, वेलतूर, गोन्हा, धानला, फेगड, रत्नापूर, शिकारपूर, खैरलांजी, बोथली, चन्ना कुजबा, टाकळी/देवळींखुर्द, खुर्सापार, राजोला, साळवा, चाफेगडी, कुही, सिल्ली, आपतूर, ब्राह्मनी ह्या गावात जनसंपर्क पदयात्रा आणि कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले. या रथ यात्रेचा उमरेड शहरात सायंकाळी भव्य प्रचार सभेनंतर समारोप झाला. तत्पूर्वी, प्रत्येक गावातील मुख्य चौकात आणि वस्तीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह महायुतीच्या घटक पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागाने जनसंवाद रथ यात्रेची रंगत वाढवली. शनिवारी शिवसेनेच्या प्रचार रथाचे सर्व समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. तसेच रामटेक लोकसभा निवडणुकीत राजू पारवेंच्या विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. विविध समाजातील बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.