- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपुर समाचार : प्रकाश जाधवची भाजपला चेतावनी सीहिंमत असेल तर आम्हाला रोखून दाखवा’

ठाकरे सैनिकांचा १२ तारखेला बर्डी ला करनार आंदोलन

नागपुर समाचार : उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळणाऱ्या भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्यावतीने उद्या (ता. १२) बुधवारी दुपारी तीन वाजता व्हेरायटी चौकात निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. हिंमत असेल तर आम्हाला रोखून दाखवा, असा इशारा माजी खासदार प्रकाश जाधव यांनी गृहमंत्र्यांना दिला. (Thackeray’s soldiers warned that if you have the courage, stop us)

उद्धव ठाकरे यांचे विमानतळावरचे फलक फाडणाऱ्या तसेच त्यावर काळे फासणाऱ्या भाजपच्या विकृत कार्यकर्त्यांविरोधात शिवसैनिकांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर पत्रकार परिषदेत जाधव म्हणाले, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्रीचा अपमान कुठलाच शिवसैनिक सहन करणार नाही.

आम्ही शिवसैनिक यासाठी कुठलीही किंमत मोजायला तयार आहोत. शिवसैनिक पळपुटा नाही. किती लोकांना जेलमध्ये टाकता ते आम्ही बघतो. कोणी आमच्या अंगावर येत असेल तर त्याला शिंगावर घेऊ असे ते यावेळी म्हणाले. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडणे हा महाराष्ट्रासाठी कलंकच आहे. भाजपने संपूर्ण राज्यच कलंकित केले आहे.

शहरालाही कलंकित करण्याचे काम भाजपनेच केले आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्य परिस्थिती मांडली. त्यामुळे भाजपचा संताप सुरू असल्याचे जाधव यावेळी म्हणाले. पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया, राजू हरणे, देवेंद्र गोडबोले, शहर प्रमुख नितीन तिवारी, पूर्व विदर्भाचे संघटन प्रमुख सतीश हरडे, हर्षल काकडे, माधुली पालिवाल आदी उपस्थित होते.

Uddhav Thackeray and Prakash JadhavUddhav Thackeray Question to PM Modi : ‘त्या’ सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपाचं काय झालं? ठाकरेंचा मोदींना थेट सवाल

बावनकुळे यांनी बोलूच नये..

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भ्रष्टाचारावर बोलूच नये. नाही तर ते ऊर्जामंत्री असताना कोराडी औष्णिक ऊर्जा प्रकल्प, कोळसा आणि रेतीघाटाचे घोटाळे घेऊन आम्ही समोर येतो. तेव्हा पळता भुई थोडी होईल, असा इशारा प्रकाश जाधव यांनी दिला.

भाजपला पोलिसांचे संरक्षण..

भर रस्त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पुतळा जाळत असताना पोलिस बघे होऊन उभे होते. परवानगीशिवाय आंदोलन करीत असताना पोलिसांनी त्यांना रोखले नाही. भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांना पोलिस संरक्षण देत होते, असा आरोपही ठाकरेंच्या शिवसेनेच्यावतीने (Shivsena) करण्यात आला. कोणाच्या दबावात पोलिस आहेत, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *