- Breaking News, खासदार क्रीड़ा महोत्सव, नागपुर पुलिस

नागपुर समाचार : नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवात नितीन गडकरींची उपस्थिती; स्वतः खेळून वाढवला खेळाडूंचा उत्साह

नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत सुरू असलेल्या विविध क्रीडा स्पर्धांना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंशी संवाद साधत त्यांचे मनोबल उंचावले.

विशेष म्हणजे, गडकरी यांनी स्वतः बास्केटबॉल, बॅडमिंटन आदी खेळांमध्ये सहभाग घेत मैदानावर खेळाडूंसोबत काही क्षण घालवले. त्यांच्या सहभागामुळे उपस्थित खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी अशा महोत्सवांचे महत्त्व अधोरेखित करत गडकरी यांनी युवकांनी खेळाकडे अधिक गांभीर्याने पाहावे, असे आवाहन केले. महोत्सवादरम्यान विविध वयोगटांतील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.