नागपूर समाचार : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब (भाई) यांचा दिनांक २१ मे २०२६ रोजी रात्री १ वाजता नागपूर येथे तत्कालीन दौरा झाला.
संत्रानगरीत आगमन होताच नागपूर विमानतळावर शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष, विदर्भ यांच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक तथा मुंबई मंत्रालय वैद्यकीय मदत कक्षाचे O.S.D. श्री. मंगेश जी चिवटे साहेब, माजी आमदार श्री. मनोहर जी चंद्रिकापुरे, विदर्भ प्रमुख प्रवीण लता बालमुकुंद शर्मा तसेच जिल्हा प्रमुख सचिन भाऊ शर्मा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यानंतर रात्री ३ वाजता नागपूर येथील रवि भवन येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, विदर्भाच्या वतीने मार्गदर्शक आदरणीय श्री. मंगेश जी चिवटे साहेब यांचेही स्वागत करण्यात आले.




