गोंदिया समाचार : नागपूर विभागाच्या, विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांनी गोंदिया जिल्हा परिषदेला भेट देऊन आढावा सभा घेतली. दरम्यान या आढावा सभेत विकास कामांवर भर देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित सभेत आयुक्त श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा सभा घेण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम.वासनिक यांच्यासह सर्वच विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम यांनी जिल्ह्यातील विकास कामाचा आढावा सादर करुण माहिती दिली. यावेळी पंचायत विभागाने 15 वा वित्त आयोगांतर्गत आढावा प्रस्तुत करुण, पंधरावा वित्त आयोग अंतर्गत 487 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला असून पैकी 402 कोटींची कामे झाली आहेत. त्याची टक्केवारी 83 आहे.यावर आयुक्त बिदरी यांनी समाधान व्यक्त केलं. या आढावासभेत विविध विभागानी सादर केलेल्या माहिती नुसार
सुमारे अडीच हजार लेखाआक्षेपांचा निपटारा करण्यात आला आहे.याप्रसंगी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात कर वसुलीचे प्रमाण 75 टक्के आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक अंतर्गत 95 हजार 111 घरकुल मंजूर असताना पैकी 94 हजार 419 घरकुल पूर्ण झाली आहेत. आयुष्यमान भारत कार्ड निर्मितीचे चार हजार उद्दिष्ट असताना पैकी सात हजार 382 कार्ड अतिरिक्त तय्यार करण्याचे साध्य झाले आहे. कृषी विभागाने सादर केलेल्या आढावा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना,बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या अंतर्गत रुपय 14 कोटी 68 लाखाची बांधकामे झाली आहेत.
दरम्यान शिक्षण विभागाने आपला आढावा प्रस्तुत केला, यामध्ये त्यांनी सांगितलं की गोंदिया जिल्ह्यात 1 हजार 637 शाळा असून यामध्ये 8हजार 365 शिक्षक सुमारे दोन लाख 26 हजार 621 विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. या शाळांमध्ये नगरपरिषद आणि अनुदानित शाळांचा समावेश आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेअंतर्गत 17 हजार 475 मातांना लाभ देण्यात आला आहे. दरम्यान उमेद विभागाने आपला आढावा प्रस्तुत करून जिल्ह्यात एकूण लखपती दीदिंची संख्या एक लाख 45 हजार 697 असून 92 टक्के लक्ष पूर्ण झाले असल्याचे सांगितले. आरोग्य विभागाने सादर केलेल्या आढावा मध्ये प्रधानमंत्री जण आरोग्य योजनेचे सुमारे 12 लाख 71 हजार लाभार्थ्यांचे उद्दिस्ट असून पैकी सात लाख 30 हजार लाभार्थ्यांचे उद्दिस्ट साध्य झाले आहे.
गोंदिया जिल्ह्यात स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येऊन वैयक्तिक शौचालय 94% पूर्ण झाली आहेत. घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन 99 टक्के पूर्ण झाले आहेत. सार्वजनिक शौचालय 63 टक्के पूर्ण झाले असून 98% गावे ओडीएफ झाली आहेत. दरम्यान प्लास्टिक व्यवस्थापन 38 टक्के पूर्ण झाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर जिल्ह्यातील 267 ग्रामपंचायतीमध्ये साडे नऊ हजार मजूर सध्यातरी कामावर आहेत. तर गोंदिया जिल्ह्यात सिंचन विहिरीवर 100% काम पूर्ण झाले असून 83% प्रगती पथावर आहेत. यावर दोन कोटी 58 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे यावर 100% उद्दिष्ट पूर्ण झाले आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा योजना अंतर्गत सोलरवर आधारित 245 योजनेची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती यासंगी देण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांचा हा शासकीय दौरा कार्यक्रम होता.त्यांनी विकास कामाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केलं. अर्भक मृत्यू दर, माता मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच उष्माघातापासून बचाव करण्यासाठी शेड उभारण्याचे निर्देश दिले.




