नागपूर समाचार : महाल परिसरातील श्री राजेंद्र हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाने यावर्षीही माध्यमिक शालांत परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत 98.72 टक्के निकाल नोंदवला आहे. 2025-26 या शैक्षणिक सत्रात शाळेतील एकूण 391 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 386 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यावर्षी 12 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विशेष प्राविण्य मिळवले, तर 89 विद्यार्थ्यांनी प्राविण्यश्रेणी प्राप्त केली आहे. शाळेतील शौर्य विनय गुप्ता याने 96.6 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. मनीष विजय नाकाडे याने 95 टक्के गुण मिळवत द्वितीय स्थान मिळवले, तर प्रांजल राजेंद्र वैराकडे हिने 93.8 टक्के गुणांसह तृतीय स्थान मिळवले.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांनी दि. एम. पी. एज्युकेशन सोसायटीचे सचिव मोहन नाहातकर, सहसचिव विवेक नाहातकर, मुख्याध्यापिका डॉ. स्मिता नाहातकर, उपमुख्याध्यापिका डॉ. अर्चना बोडखे, पर्यवेक्षिका वर्षा निवांत, पर्यवेक्षक विलास जाधव, तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांचे आभार मानले.
मुख्याध्यापिका डॉ. स्मिता नाहातकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत बारावीच्या परीक्षेतही ही यशाची परंपरा कायम राखण्याचे आवाहन केले.




