- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपुर समाचार : नागपुरात भाजप आणि युवा मोर्चातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

नागपुर समाचार : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नागपूर महानगरात भारतीय जनता पार्टीतर्फे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहरातील सर्व १५१ वॉर्डांमध्ये शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीतर्फे प्रत्येक बूथवर कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले होते,ज्यानुसार शहरातील १५०० हून अधिक बूथवर शिवजयंती उत्साहात साजरी झाली.भाजपच्या विविध आघाड्यांतील कार्यकर्त्यांनीही आपापल्या क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर तर्फे सकाळी ९ वाजता महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, महापौर नीताताई ठाकरे, उपमहापौर लीलाताई हाथीबेड, सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर, आमदार प्रवीण दटके, संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, माजी आमदार गिरीशजी व्यास, शहर महामंत्री श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे, संपर्क महामंत्री विष्णू चांगदे, कार्यालय मंत्री ब्रिज भूषण शुक्ला, नगरसेवक रामभाऊ आंबूलकर, भोजराज डुंबे, बंडू राऊत, सचिन नाईक, सारिका नंदुरकर, वर्षा उदापूरकर, कल्पना शर्मा, उमा देशमुख, सुधीर हिरडे, मनोज साबळे, अमोल कोल्हे, गजेंद्र पांडे, सुमित मिश्रा व इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.