- Breaking News, आयोजन, नागपुर पुलिस

नागपूर समाचार : मातृ सेवा संघाचा स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे सफल आयोजन

नागपूर समाचार : मातृ सेवा संघ द्वारे संचालित नंदनवन दुर्बल मनस्क मुलांची शाळा, नंदनवन संरक्षित कर्मशाळा आणि स्नेहांगण दिव्यांग मुलांची शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने रंजन सभागृह, सीताबर्डी, नागपूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक ३/०२/२०२६ मंगळवार रोजी मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे सन्मानीय उपमुख्यमंत्री स्व. श्री. अजीतदादा पवार, श्रीमती गोरी चांद्रायाण, श्रीमती वनिता ताई पाटील या सर्व निधन झालेल्या मान्यवराना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथीगण श्रीमती शिवानीताई दाणी वखरे अध्यक्ष BJYM आणि कॉर्पोरेटर नागपूर, श्री. अजय अहिवले जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नागपूर, श्री. प्रविण मोठे, श्री. सचिन रामटेके, श्री. प्रशांत वाढीवे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग नागपूर, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वप्रथम मातृसेवा संघाच्या संस्थापिका के. कमलाताई होस्पेट आणि डॉ. कुसुमताई वांकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

स्नेहांगण शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. शाळेसाठी तन-मन-धनाने झटणाऱ्या, निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या श्रीमती सुजाता सन्याल, श्रीमती वीणा मोहाडीकर, श्रीमती मयुरी टेंभुरे, श्री. रुषाक नाईक, श्री. शार्दूल पाटील, ग्लोबल फाउंडेशनच्या डॉ. माधुरी ठाकरे, डॉ. मानसी कोतवालीवाले या सर्व देणगीदाराचे सत्कार करण्यात आले.

स्नेहांगण शाळेतील इयत्ता १० वीचे विद्यार्थी गौरव साटोणे व कु. प्रिन्सि बंसोड या गुणवंत विद्यार्थीचा पुरस्कार मान्यवराच्या हस्ते देण्यात आला. मातृ सेवा संघाच्या सचिव डॉ. लता देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

जिल्हा दिव्यांग कल्याण सक्षमीकरण विभाग अधिकारी श्री. अजय अहिवळे मनोगत व्यक्त करताना तिन्ही शाळेच्या कार्याविषयी समाधान व्यक्त केले. ” दिव्यांग विद्यार्थ्यांची काळजी घेणारे सर्व कर्मचारी, मुलांना शिक्षण व विविध कलागुण शिकवणारे सर्व शिक्षक या सर्वांच्या कार्याला माझा सलाम या शब्दात श्रीमती शिवानी ताईने विशेष शाळेत चालणा-या कार्याविषयी गौरउद्वार काढले तसेच शक्य ती सर्व सहकार्य मदत करण्याचे आश्वासन दिले.

हस्तकला प्रदर्शनीला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तूंचे कौतुक केले. स्नेहसंमेलनाचा आकर्षणाचा बिंदू असणारा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी रंगारंग कार्यक्रम सादर करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. ” सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शना नंतर राष्ट्रगीताने स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मृणाली देशमुख यांनी केले तसेच श्रीमती सांस्कृतीक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलीमा बेलसरे यांनी आभार प्रदर्शन श्रीमती रंजना सुखदेवे यांनी केले. श्रीमती शामली पाराशर, श्रीमती मेघा रंगनाथ, श्रीमती वैशाली कोरडे, श्रीमती श्वेतांबरी गोजे, श्रीमती सारा अंबादे, श्रीमती दिपीका पाटील, सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी पालकवर्ग उपस्थित होते.