- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपुर समाचार : आरोग्य संबंधीच्या विविध समस्यांवर केली जनजागृती 

दोन दिवसीय ‘ऑरेंज सिटी आरोग्य फिल्म फेस्टिव्हल’ चा समारोप

नागपूर समाचार : देहदान, कर्करोग, मानसिक आरोग्‍य, पर्यावरण, डिमेन्शिया, ड्रग अॅडीक्‍शन यासह कौटुंबिक, भावनिक अशा अनेक विषयांवरील लघुपटांच्या माध्यमातून जनजागृती करत दोन दिवसीय ‘ऑरेंज सिटी आरोग्य फिल्म फेस्टिव्हल’ चा रविवारी समारोप झाला.

ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनच्या वतीने आणि पीएम शाह फाउंडेशन, नागपूर महानगरपालिका, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, सप्तक नागपूर व सिने-मोंटाज यांच्या सहकार्याने पर्सिस्टंट सिस्टिम्समधील कवी कुलगुरू कालिदास सभागृहात या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. 

ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी यावेळी आगामी 21 व 22 नोव्हेंबर 2026 ला मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला जाईल, अशी घोषणा केली. तसेच, दोन दिवसात ऐ जिंदगी या बहुचर्चित चित्रपटासोबत एकूण 43 लघु आरोग्य चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. या सर्व लघुपटाना भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल विद्यार्थी व दर्शकांचे त्यांनी आभार मानले.

आयोजनाच्‍या यशस्‍वीतेसाठी विलास मानेकर, डॉ. उदय गुप्ते, डॉ. सुधीर भावे, प्रशांत जोशी, उदय पाटणकर, प्रमोद कळमकर, श्रीराम काणे, नितीन सहस्‍त्रबुद्धे, विकास लिमये, श्रीकांत देशपांडे, रवी डोंगरे, मंजुषा जोशी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.