नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिका निवडणूक–२०२६ साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जाहीरनामा आज जाहीर करण्यात आला. या जाहीरनाम्यात काँग्रेसने २४x७ पाणीपुरवठा (महिन्याला ३०,००० लिटर पर्यंत मोफत), ५०० चौ. फु. पर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी, तसेच महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक आणि माजी सैनिकांसाठी मोफत शहर बस सेवा यांसह नागपूरकरांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित १७ हून अधिक जनहितकारी योजना जाहीर केल्या आहेत.
या जाहीरनाम्यात नागपूर महानगरपालिकेत गेल्या १९ वर्षांत भाजपच्या अपयशी कारभारामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा स्पष्ट आणि ठोस उल्लेख करण्यात आला असून, त्या अपयशांवर प्रभावी उत्तर देण्यासाठी काँग्रेसने २० सूत्रांचा सर्वसमावेशक व लोकाभिमुख आराखडा सादर केला आहे. या २० सूत्रांच्या माध्यमातून स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट नागपूर घडवण्याचा ठाम व निर्धारपूर्ण संकल्प काँग्रेसने व्यक्त केला आहे.
मा. हर्षवर्धन सपकाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, यांच्या प्रमुख उपस्थितीत महाकालकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचा जाहीरनामा मराठी व हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आला. यावेळी विजय वडेट्टीवार, राज्य विधिमंडळातील काँग्रेस पक्षनेते, कुणाल चौधरी, काँग्रेसचे राज्य सहप्रभारी, रंजित कांबळे, काँग्रेसचे शहर निरीक्षक, विकास ठाकरे, अध्यक्ष, नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी, अभिजीत वंजारी, आमदार, अतुल लोंढे, प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, माजी मंत्री अनीस अहमद, माजी आमदार अशोक धवड, दिनेश बनाबकोडे, नागपूर शहरासाठी काँग्रेसचे निवडणूक प्रमुख तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात काँग्रेसच्या १५१ उमेदवारांना संबोधित करण्यात आले.
काँग्रेसने या जाहीरनाम्यातून दर्जेदार व प्रभावी मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २० सूत्रांचा जनहितकारी आराखडा मांडला असून, स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट नागपूर घडवण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला आहे. गेल्या अनेक वर्षांत नागपूरकरांवर वाढविण्यात आलेल्या आर्थिक ओझ्याला दिलासा देत, नागरिककेंद्रित प्रशासन देण्याचा निर्धार काँग्रेसने पुन्हा एकदा अधोरेखित केला.
याप्रसंगी काँग्रेसने आधीच जाहीर केलेल्या Mission 100 काँग्रेस नगरसेवक या अभियानाचा उल्लेख करत, नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या आशीर्वादाने हे मिशन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने नागपूरकरांच्या हितासाठी काम करतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
जाहीरनामा : काँग्रेसचे २० सूत्र — एकच ध्येय: स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट नागपूर
• ५०० चौ.फुटांपर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता कर पूर्णतः माफ
• २४x७ अखंड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा — आणि महिन्याला ३०,००० लिटरपर्यंत पाण्यावर एकही रुपयाचे पाणीबिल नाही
• ‘आपली बस’ मध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक व महिलांसाठी मोफत प्रवास
• प्रत्येक घरातून दिवसातून दोन वेळा कचरा संकलन
• NMC, NIT व नझूल लीजवरील प्लॉट्सना मोफत फ्रीहोल्ड
• सर्व झोपडपट्टीधारकांना मोफत मालकी हक्काचे पट्टे
• दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आवश्यक साधने, यंत्रसामग्री व साहित्य मोफत
• BPL कुटुंबांसाठी बाजारपेठांमध्ये मोफत दुकाने व ओट्टे
• पदवीधर युवकांसाठी स्वयंरोजगारासाठी विशेष मोफत योजना
• NMC व NIT मध्ये युवकांसाठी तात्पुरत्या रोजगाराच्या संधी
• Intelligent & Integrated Traffic Management System & Comprehensive Mobility Plan यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडीमुक्त शहर
• वाहतूक कोंडीतून कायमची मुक्तता
• पूर व पाणी साचण्याच्या समस्येला कायमचा आळा
• शहरातील सर्व रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त करणे
• मोफत शिक्षणासह १५१ इंग्रजी माध्यमांच्या शाळांची स्थापना
• शहरातून भांडेवाडी डम्पिंग यार्डचे कायमस्वरूपी स्थलांतर
• आरक्षण जमिनीवरील सर्व अनधिकृत प्लॉट्सना आर.एल. मंजुरी
• डासमुक्त व आरोग्यदायी शहराची उभारणी
• सांडपाणी समस्येचे संपूर्ण व कायमस्वरूपी निराकरण
• १५१ फेरीवाला व खाऊ गल्ल्यांची निर्मिती
अधिक व्यापक व जनहितकारी संकल्प
• प्रमुख चौक व बाजारपेठांमध्ये मोफत वाय-फाय सुविधा
• मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये मोफत पार्किंग सुविधा
• १५१ नव्या उद्यानांचा विकास
• नाग, पिली, पोरा नद्या तसेच शहरातील सर्व तलावांचे सौंदर्यीकरण (म्युझिकल फाउंटन व फूड झोनसह)
• स्मार्ट ट्रॅफिक सिग्नलिंग व हायटेक स्ट्रीटलाईट्स
• १५१ नवीन भाजीपाला व मांसाहारी बाजारपेठा
• नियमित झालेल्या सर्व लेआउट्सचे ओपन स्पेसेस व पीयू जमिनींसह नागपूर महानगरपालिकेकडे हस्तांतरण
• सक्रिय नागरिकांच्या सहभागातून प्रभाग समित्यांची स्थापना
• ५ नवीन झोनची निर्मिती
• पुरेशा सार्वजनिक शौचालयांची उभारणी
• नवीन वॉकर स्ट्रीट्सचा विकास
• १५१ नवीन क्रीडांगणांची निर्मिती
• शहरासाठी नवीन विकास आराखडा
• १५ नवीन मॉल्सचा विकास
• मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वारसा वृक्षांचे संवर्धन
• मोठ्या नाल्यांची नियमित स्वच्छता
• १५१ नवीन ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षांसाठी समुपदेशन व प्रशिक्षण केंद्रे
• १५१ नवीन समाजभवन, जिम, योगा शेड्स व ग्रीन जिम्स उभारणीसह विद्यमान समाजभवन व सुविधांचे सर्वांगीण नूतनीकरण
• जिथे वास्तवात गरज आहे, तिथे रेल्वे ओव्हरब्रिज, रेल्वे अंडरब्रिज, नाल्यांवरील मजबूत पूल, उड्डाणपूल तसेच सुरक्षित पादचारी पूल उभारण्यात येतील
• मिहान, कार्गो हब, एसईझेड तसेच नवीन विमानतळ प्रकल्पांची तातडीने पूर्णता
• नवीन घाट, ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमी व कबरस्तानांचा विकास तसेच विद्यमान सुविधांचे पुनर्विकास.
नागपूर महानगरपालिकेत गेल्या १९ वर्षांत भाजपच्या अपयशी कारभाराची मुद्देसूद यादी
• २४x७ पाणीपुरवठा योजना अपयशी; खासगी ऑपरेटर OCW च्या खिशात Rs १,००० कोटी, तर नागरिकांना महागडी पाणीपट्टी आणि अपुरा पाणीपुरवठा.
• दरवर्षी पाणीपट्टी वाढवून नागपूरकरांची लूट.
• कोविड महामारीत रुग्णालयांत खाटा, चाचण्या, ऑक्सिजनचा तुटवडा; शेकडो नागरिकांचा बळी.
• ‘आपली बस’ सेवा मोडकळीस; कोणताही समन्वय नसलेला Rs १०,००० कोटींचा मेट्रो प्रकल्प—प्रवाशांपेक्षा वाढदिवस साजरे करण्यासाठीच जास्त वापर.
• Rs ३,६०० कोटींचा स्मार्ट सिटी प्रकल्प फक्त फाईलपुरता, शहरात स्मार्टपणा शून्य.
• कचरा कंत्राटदारांच्या खिशात Rs ५०० कोटी, शहरभर कचरा, दुर्गंधी आणि स्वच्छता क्रमांकात घसरण.
• निकृष्ट व भ्रष्ट कामांमुळे सिमेंट रस्ते म्हणजे नागरिकांसाठी दैनंदिन त्रास आणि अपघातांचा धोका.
• पावसाळा आला की नागपूरकरांच्या मनात भीती; वस्त्यावस्त्यांत पाणी साचणे हे नेहमीचेच.
• पथदिवे बंद, रस्ते अंधारात—महिला, ज्येष्ठ आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ.
• Rs ५०० कोटींचा सीसीटीव्ही प्रकल्प अपयशी.
• Rs २०० कोटींची एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (ITMS) कोलमडली; वाहतूक कोंडी रोजची डोकेदुखी.
• अपुरे नियोजन, भविष्यातील दृष्टीचा अभाव—शहरभर वाहतूक कोंडीचे साम्राज्य.
• स्टेशनरी घोटाळ्यासह महानगरपालिकेत घोटाळ्यांची मालिका, पण जबाबदारी शून्य.
• अंबाझरी उद्यानासह अनेक उद्याने व मनोरंजनस्थळे खासगी लोकांच्या घशात, नागरिकांसाठी बंद.
• खेळमैदाने, उद्याने व सार्वजनिक उपयोग (PU) जमिनी प्रभावशाली लोकांना वाटप—तरुणांसाठी जागाच नाही.
• भूमाफियांचा सुळसुळाट; सामान्य नागरिक असुरक्षित.
• झोपडपट्टीवासीयांना आजही मालकी हक्क पट्ट्यांपासून वंचित ठेवले.
• नियमितीकरण केलेले लेआउट्स महानगरपालिकेकडे न दिल्याने नागरी सुविधा रखडल्या.
• नागरिकांना महानगरपालिका व NIT या दोन यंत्रणांत हेलपाटे—एकही जबाबदार नाही.
• खड्ड्यांनी भरलेले रस्ते; पावसाळ्यात परिस्थिती अधिक भयावह.
• नाग, पिली, पोरा नद्या व तलावांचे पुनरुज्जीवन केवळ घोषणांपुरतेच; प्रत्यक्षात अपयश.
• एकही नवा भाजी बाजार, एकही मॉल नाही—शहराचा नियोजित विकास ठप्प.
खाऊ गल्ली सुरू होण्याआधीच बंद करण्यात आली
• बिल्डरधार्जिण्या धोरणांसाठी फेरीवाल्यांवर अत्याचार; मध्यमवर्गीय व गरीब जनतेचे हाल.
• डासजन्य व विषाणूजन्य आजारांवर नियंत्रण नाही; आरोग्य यंत्रणा कोलमडलेली.
• रस्ते, अंतर्गत रस्ते व रेल्वे अंडरब्रिजमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य.
• ओपीडी, निदान व उपचार सुविधांचा अभाव; सामान्य नागरिक खासगी रुग्णालयांच्या लुटीला बळी.
• मराठी, हिंदी व उर्दू माध्यमांच्या शाळा बंद; इंग्रजी माध्यमांच्या नव्या शाळा सुरू करण्यात अपयश—शिक्षणाचा घसरता दर्जा.




