भारतीय रिअल इस्टेट सल्लागार
नागपूर समाचार : रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत सल्लागार, एजंट व विकासकांच्या हक्कांसाठी आणि हितसंबंधांच्या संरक्षणासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या भारतीय रिअल इस्टेट सल्लागार/एजंट वेल्फेअर युनियनचा द्वितीय वर्धापनदिन सोहळा सोमवार, 12 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा प्लॉट नं. 10-ए, पहिला माळा, चंदननगर, जय पेंट अँड हकीमी हार्डवेअर जवळ, संगम रेस्टॉरंट रोड, मेडिकल चौक, नागपूर येथे होणार आहे.
युनियनच्या स्थापनेपासून गेल्या दोन वर्षांत रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता निर्माण करणे, सल्लागार व एजंट यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवणे, तसेच संघटनेच्या माध्यमातून व्यावसायिकांमध्ये एकजूट घडवून आणणे या उद्देशाने उल्लेखनीय कार्य करण्यात आले आहे. अल्पावधीतच युनियनने रिअल इस्टेट क्षेत्रात विश्वासार्ह व भक्कम अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या वर्धापनदिन सोहळ्यास नागपूर शहर व परिसरातील रिअल इस्टेट व्यावसायिक, सल्लागार, एजंट, बिल्डर्स व डेव्हलपर्स मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात युनियनच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला जाणार असून भविष्यातील धोरणे, योजना व कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व रिअल इस्टेट व्यावसायिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन केले असून सर्वांच्या सहभागातून संघटनेचे मनोबल अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.




